आमगाव: आमगावात चनेफुटाणे विक्रेत्यावर हल्ला,दारू विक्रीबाबत झालेल्या वादातून चनेफुटाणे विक्रेत्याला मारहाण
Amgaon, Gondia | Oct 17, 2025 दारू विक्रीबाबत झालेल्या वादातून चनेफुटाणे विक्रेत्यावर मारहाण केल्याची घटना १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आमगाव येथे घडली आहे. या प्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यात प्रविण डिब्बु शिवणकर (३०) रा. बनगाव, ता. आमगाव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.विजय राजेश्वर रहिले (६१) हे पसीने वाईन शॉपच्या मागे असलेल्या चने-फुटाण्याच्या दुकानातून आपला उदरनिर्वाह चालवतात. ते दररोज सकाळी ६ वाजता दुकान उघडतात व रात्री १० वाजता बंद करून घरी जा