नागपूर ग्रामीण: बेसा येथील कॅटर्सच्या गोदामाला भीषण आग; ५० लाखांचे नुकसान
बेसा येथील पिपळा रोडवर असलेल्या 'उत्कर्ष सोसायटी' मधील 'हिवरे कॅटर्स'च्या गोदामाला आज दुपारी भीषण आग लागली. या दुर्घटनेत गोदामातील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.अग्निशमन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी २:४४ वाजता या आगीचा कॉल प्राप्त झाला.