शहरातील पार्किंग कंत्राट फक्त एक हजार रुपये प्रतिदिन या दराने नाशिकच्या दिग्विजय इंटरपाईजेस कंपनीला देऊन दररोज लाख रुपयांची बेकादेशीर वसुली करण्यास परवानगी दिल्याचा गंभीर आरोप युवा सेना राज्य सहसचिव आणि माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी केला आहे कंत्राटानुसार पद्धतीने फक्त अधिकृत रक्कम घेण्याची मुभा असूनही कंपनी बेकायदेशीर टोइग वाहने वापरून रस्त्यावरील वाहने उचलत आहे आणि वाहन मालकांकडून 800 ते 1000 रुपयांचा मनमानी दंड वसूल करत आहे