दर्यापूर: सततच्या पैशाच्या मागणीला कंटाळून भूजल सर्वेक्षण विभागातील कर्मचाऱ्याची आत्महत्या;रहीमापूर पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल
सततच्या पैशाच्या मागणीला कंटाळून धुळे येथे भूजल सर्वेक्षण विभागात कार्यरत असलेल्या वडाळगव्हाण येथील रहिवाशी असलेल्या कर्मचाऱ्याने आत्म्हत्या केल्याची घटना दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली.या प्रकरणी रहीमपूर पोलिस ठाण्यात कलम ३०६, ३४ भादंवि तसेच कलम १०८, ३(५) भान्यासंहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतकाचे कार्यालयातील एका महिला सहकार्यासोबत प्रेम संबंध होते.