केज: केज तालुक्यातील सारणी येथील मूकबधिर शाळेचे शिक्षकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली
Kaij, Beed | Sep 19, 2025 केज तालुक्यातील सारणी (सां.) येथे एका मूकबधिर विद्यालयातील शिक्षकाने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविेले. ही घटना शुक्रवारी (दि.१९) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.अशोक नारायण भंडारे (वय ४६) असे या शिक्षकाचे नाव आहे.सारणी (सां.) ता. केज येथील अशोक भंडारे हे उमरी फाटा येथील मूकबधिर व मतिमंद निवासी विद्यालयावर शिक्षक होते. ते केज शहरात वास्तव्यास होते. शुक्रवारी ते सारणी (सा.) या आपल्या गावी जात आपल्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतला.