वर्ध्यात सिटु संघटनेच्या नेतृत्वाखाली शालेय पोषण आहारया कामगारांनी दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास जिल्हा परिषदेसमोर ठिय्या देत आंदोलन केले. मानधन दहा महिन्यांऐवजी 12 महिने देणे, मासिक पेन्शन योजना लागू करणे, विद्यार्थी संख्या निकष रद्द करून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेणे तसेच मानधन वाढविण्याच्या मुख्य मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.