नागपूर ग्रामीण: शैक्षणिक पद्धतीला भविष्यातील आव्हानांनुसार नवी दिशा आवश्यक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"केवळ ऐतिहासिक गौरवावर अवलंबून न राहता, वर्तमान आणि भविष्यातील जागतिक आव्हाने पेलण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करणे काळाची गरज आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे केले. व्हीएनआयटी मध्ये आयोजित ‘महाराष्ट्र ज्ञान सभा-२०२६’या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.मागील १५ वर्षांत जगाने तीन औद्योगिक क्रांती अनुभवल्या आहेत.या कार्यक्रमात शिक्षण व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.