माण: माण बाजार समितीवर अखेर फडकला भाजपचा झेंडा; मंत्री जयकुमार गोरे यांच्या व्यूव्हरचनेमुळे ब्रह्मदेव पुकळे झाले सभापती
Man, Satara | Oct 19, 2025 संपूर्ण सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असलेल्या मान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ब्रह्मदेव पुकळे यांची रविवारी सकाळी ११ वाजता निवड झाली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या व्यूव्हरचनेमुळे भाजपचा बाजार समितीवर झेंडा फडकला आहे. माण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक २०२१ साली झाली होती. २० ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या सभापती निवडीत भाजप समर्थक विलासराव देशमुख हे १० विरुद्ध ७ मतांनी निवडून आले होते.