जालना: उपोषणकर्त्या महिलेचा जीव धोक्यात, तरीही प्रशासन झोपेत! पाच दिवसांपासून आमरण उपोषण; तरीही अधिकाऱ्यांचा पत्ता नाही
Jalna, Jalna | Apr 17, 2026 जालना शहरात मालकी हक्काच्या जमिनीच्या वादातून सुरू असलेले आमरण उपोषण आता प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गंभीर टप्प्यावर पोहोचले आहे. सौ. जयश्री संजय कटके या आपल्या हक्काच्या जमिनीवर गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसल्या आहेत. मात्र प्रशासनाने अद्याप त्याकडे पूर्णतः पाठ फिरवली असल्याचे संतापजनक वास्तव समोर आले आहे. उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालावत असताना एकही जबाबदार अधिकारी भेटीस न आल्याने तीव्र रोष पसरला आहे. कटके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, त्यांच