लाखनी: मुरमाडी/सा. येथे विजेचा धक्का लागून 55 वर्षीय महिलेचा मृत्यू; लाखनी पोलिसांत घटनेची नोंद
लाखनी तालुक्यातील मुरमाडी/सा. येथील 55 वर्षीय इंदिरा घनश्याम बडवाईक यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. इंदिरा बडवाईक यांच्या घराच्या दरवाजाच्या लोखंडी फ्रेममध्ये वीज प्रवाह (करंट) उतरला होता. दरवाजाला हात लावताच त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी विकास पांडुरंग पडोळे यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून, आणि डॉक्टरांच्या अहवालानंतर लाखनी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला.