नागपूर ग्रामीण: स्वयंसेवी संस्थेच्या आड तरुणींशी अश्लील चाळे करणाऱ्या रियाज काझीच्या पोलीस कोठडीत वाढ
नागपूरमध्ये 'युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी' या स्वयंसेवी संस्थेच्या संचालकाने, रियाज फाजिल काझी (वय ४८) याने एका २३ वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण करून तिला धर्मांतरासाठी सक्ती केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संचालक काझीने तरुणीला धमकावून तिचे अश्लील वर्तन केले आणि तिला धर्मांतर करण्यास भाग पाडले. तो संस्थेत काम करणाऱ्या इतर तरुणींशीही गैरवर्तन करायचा आणि त्यांच्यावर 'डिजिटल वॉच' ठेवायचा.