नाशिक: नाशिकमध्ये तुळशी विवाह उत्साहात पार : भक्ती, निसर्ग आणि मंगलतेचा संगम
Nashik, Nashik | Nov 2, 2025 टाळांचा गजर, विठ्ठल नामस्मरण, मृदंगाचे धून ,फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि “शुभमंगल सावधान”च्या गजरात आज (२ नोव्हेंबर) नाशिकमध्ये तुळशी विवाहाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. देवउठनी एकादशीपासून सुरू झालेल्या या उत्सवामुळे शहरात आनंदी आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.