कोळपेवाडी येथे आज दिनांक ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. विविध विकासकामांचे लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले.यामध्ये 50 लक्ष रुपये निधीतून श्री महेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण करणे, 10 लक्ष रुपये निधीतून श्री महेश्वर मंदिर परिसरात रस्ता काँक्रिटीकरण करणे, 24 लक्ष रुपये निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 2 खोल्या बांधणे, 12 लक्ष रुपये निधीतून उर्दू प्राथमिक शाळेस एक शाळा खोली बांधणे आणि 10 लक्ष रुपये निधीतून सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्ती सोय करणे आदी लोकार्पण पार पडले.