पेण: रायगड फोटो एक्स्पो २०२५ मध्ये अलिबागच्या प्रिया पाटीलला मिस रायगड फोटोसुंदरी २०२५ हा मानाचा किताब
Pen, Raigad | Sep 26, 2025 रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनतर्फे आयोजित भव्य "रायगड फोटो एक्स्पो २०२५" या प्रदर्शनात मिस रायगड फोटोसुंदरी २०२५ हा मानाचा किताब अलिबागच्या विजयनगर येथील प्रिया पाटील हिने पटकावला.या भव्य एक्स्पोचे उद्घाटन रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील तसेच पेणच्या माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, समीर म्हात्रे, अध्यक्ष समीर भायदे, उपाध्यक्ष समीर मालोदे आदी उपस्थित होते.