पुणे शहर: पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला, नमाज पठण करणाऱ्या महिलांविरोधात केला गुन्हा दाखल
Pune City, Pune | Oct 21, 2025 पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. वाड्यामध्ये असलेल्या कबरीच्या बाहेर हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी याच शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या विरोधात पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये महिलांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.