हिंगोली: लिंबाळा औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोदामात धान्याची नासाडी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंगोली शहरालगतच्या लिंबाळा औद्योगिक वसाहतीमधील वखार महामंडळाच्या गोदामात शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले शेकडो क्विंटल धान्य सडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पीक कर्ज परतफेडीसाठी व बाजारात विक्रीसाठी आपले धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामात साठवले होते.