शेतकरी आपल्या घरातील दुःख संकटे बाजूला करून शेती करतो. परिश्रम करतो. पण एवढे कष्ट करूनही त्याच्या हातात काहीच उरत नाही. जर शेतीमाल दिल्ली सारख्या दूरच्या बाजारात विकला जाणार असेल तर त्याच्यामागे शेतकरी कुठे फिरणार. म्हणूनच याबाबतचे स्पष्टीकरण दिले गेले पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील हे दुःख कमी झाले पाहिजे अशी मागणी आमदार नाना पटोले यांनी केली.