स्थानिक गुन्हे शाखेने भंडारा शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई करत एका आरोपीला गांजासह रंगेहाथ पकडले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स.पो.नि. पुंजरवाड व त्यांच्या पथकाने १८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वा. दरम्यान सापळा रचला. या धाडीदरम्यान आरोपी विशाल उर्फ भिसी देवेंद्रसिंग तोमर (३१ वर्ष, रा. काजीनगर, भंडारा) याच्या ताब्यातून ४,००० रुपये किमतीचा ४०४ ग्रॅम काळसर हिरवट रंगाचा गांजा जप्त करण्यात आला. आरोपीने हा अंमली पदार्थ एका गुलाबी रंगाच्या पिशवीत लपवून ठेवला होता.