बार्शीटाकळी नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक दोनमध्ये विविध समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. परिसरातील सार्वजनिक हातपंपमध्ये होल पाडण्यात आले असून त्यात कोणीही कुठलीही वस्तू टाकू शकते, त्यामुळे पाण्याची शुद्धता धोक्यात आली आहे. दूषित पाणी पिण्याची वेळ येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गंभीर प्रकाराची थेट मुख्यमंत्री यांनी पाहणी करावी अशी मागणी केली आहे.