अर्जुनी मोरगाव: शिवसेना (शिंदे गटाच्या) अनुसूचित जमाती विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार कोरोटे यांची निवड
शिवसेना (शिंदे) गटाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या अनुसूचित जमाती विभागाच्या प्रदेशाच्या अध्यक्षपदी देवरी-आमगांव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सहषराम कोरोटे यांची निवड करण्यात आली आहे.कोरोटे यांच्याकडे प्रदेशाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.