अमरावती: अंबादेवी मंदिरात खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्याकडून महाआरती, ७५ दिवे लावून मोदींचा वाढदिवस साजरा
संपूर्ण विदर्भाचे आराध्य दैवत असलेल्या अंबादेवी मंदिरात भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे व डॉ. वसुधा बोंडे यांच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या औचित्याने मंदिर परिसरात ७५ दिवे लावून भक्तिमय वातावरण निर्मिती करण्यात आली. या वेळी डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले की, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला विकसित भारताचा संकल्प दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देश सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यांनी दीनदलित व उपेक्