धर्माबाद: शहरातील शंकर गंज भागातील रेल्वे गेट अंतर्गत दुरुस्तीसाठी 5 दिवस राहणार बंद: पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार
धर्माबाद शहरातील रेल्वे स्टेशन नजीक असणाऱ्या शंकर गंज भागातील रेल्वे गेट क्र.179 हे अंतर्गत दुरुस्तीसाठी आज पासून ते 8 ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार आहे. रत्नाळी शंकर गंज सिरसखोड बेल्लूर नायगाव चिंचोली भागातील नागरिकांना धर्माबाद शहरात येण्यासाठी व जाण्यासाठी हा गेट अत्यंत महत्वपूर्ण असा होता. मात्र हे गेट बंद होण्याचे आता नागरिकांसह वाहन धारकांना इंदिरा नगर भागातील रेल्वे गेट चा आधार घ्यावा लागत आहे.