जालना: तेगबिरसिंह संधू यांनी पदभार स्वीकारला; जनतेला सर्वोत्तम सेवा देणार; संधू यांचा पदभार स्वीकारताच निर्धार
Jalna, Jalna | May 3, 2026 जालना जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात महत्त्वाचा बदल झाला असून नवे पोलीस अधीक्षक म्हणून तेगबिरसिंह संधू यांनी आज पदभार स्वीकारला. रविवार दि. 3 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असलेले अजयकुमार बन्सल यांची बदली सायबर सुरक्षा विभागात पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मालेगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले तेगबिरसिंह संधू यांची नियुक्ती करण्यात आली. तेगबिरसिंह संधू यांनी आज पदभार स्वीकारला.