जून ते सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या शेतक-यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने पुढाकार घेत 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेज अंतर्गत जिल्ह्यातील शेतक-यांना रब्बी पिकांची लागवड करण्यासाठी बियाणे व तत्सम खरीदीसाठी प्रती हे. 10 हजार रूपयांची मदत तीन हे. पर्यंत करण्याबाबात 282 कोटी 18 लक्ष रूपयांचा प्रस्ताव पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकरातून राज्य शासनाला सादर करण्यात आला. लवकरच ही मदत शेतक-यांना देण्यात येईल, अशी माहिती जि