जालना: खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा नेर येथे उत्साहात; गावात जावून शेतकर्यांना केले मार्गदर्शन
Jalna, Jalna | May 6, 2026 जालना तालुक्यातील नेर येथील खंडोबा मंदिर प्रांगणात कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कार्यशाळा उत्साहात पार पडली. बुधवार दि. 6 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कार्यशाळेत शेतकर्यांना आधुनिक शेती पद्धती, बीज प्रक्रिया, खतांचा योग्य वापर, कीडनियंत्रणासाठी औषधांचा वापर तसेच औषध फवारणीचे तंत्र याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान माजी शास्त्रज्ञ ओमप्रकाश कोहिरे यांचा उपसरपंच गणेश कुरवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.