महागाव: तालुक्यातील मुडाणा येथे भीषण आग; तीन घरे जळून खाक, लाखोचे नुकसान, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
महागाव तालुक्यातील मुडाणा येथे आज रविवार दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान भीषण आग लागून तीन घरे पूर्णतः जळून खाक झाली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, कपडे, फर्निचर व रोख रक्कम जळून नष्ट झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. महावितरणच्या डीपीजवळ झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण करत शेजारील दोन घरांपर्यंत फैलाव केला.