नांदेड: 60 वर्षे राज्य करणारे अशोक चव्हाण यांची काय परिस्थिती झाली,आमदार चिखलीकर यांची देगलूर नाका येथे अशोक चव्हाण वर टीका केली
Nanded, Nanded | Oct 7, 2025 आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान देगलूर नाका परिसरात आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले तुमच्या जीवावर 50, 60 वर्ष राज्य करणारे आज इकडे का फिरकले नाहीत, अशोक चव्हाण आता तुम्हाला मत मागायला पण येणार नाहीत असे वक्तव्य आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. अशोक चव्हाण दसऱ्यानिमित्त आर एस एस तर्फे निघालेल्या पथ संचलनावर फुलं टाकत आहेत. नियतीचा खेळ कसा आहे त्यांची काय परिस्थिती झालीये अशी बोचरीटीका आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली.