काटोल: बाजारगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेने कचरा उचलण्यास नकार दिला म्हणून विद्यार्थिनींना केली अमानुष मारहाण
Katol, Nagpur | Sep 14, 2025 पोलीस ठाणे कोंडाळी हद्दीतील बाजारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून एक खळबळ जनक प्रकार समोर आला असून पालकांमध्ये या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे 13 सप्टेंबरला सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास वर्ग पाचवीच्या दोन विद्यार्थिनींनी कचरा उचलण्यास नकार दिल्याने शिक्षिका मनीषा चौधरी यांनी दोघींनाही अमानुषपणे मारहाण केली. श्रेयाली गाढवे व 11 वर्ष ही विद्यार्थीनी बेशुद्ध पडली तर सोनम सहारे वय 11 वर्ष हिला गं गंभीर दुखापत झाली.