सेनगाव: पुसेगांव येथे शिवछत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने पुसेगांव भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
सेनगांव तालुक्यातील पुसेगांव या ठिकाणी आज शिवछत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने पुसेगांव भूषण पुरस्कार सोहळा 2025 चे वितरण करण्यात आले. सामाजिक,राजकीय,सहकार,शिक्षण,उद्योग,कृषी,साहित्य,कला,क्रीडा,आरोग्य,अध्यापन,पत्रकार युवा, क्षेत्रातील यशस्वीतांचा सत्कार करण्यात आला. सदरचा कार्यक्रम महावीर भवन पुसेगांव या ठिकाणी आयोजित करण्यात आला. शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष सितारामजी जवळे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला.