परभणी: साई कॉर्नर येथे ऑनलाईन सर्व्हिसेस दुकान फोडून चोरी ; चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद नानलपेठ पोलीसात गुन्हा दाखल
शहरातील डॉ. झाकेर हुसेन नगर येथील साई कॉर्नर परिसरात चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली. नवीद ऑनलाईन सर्व्हिसेस या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले अंदाजे पंचेचाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार २८ ऑक्टोबरच्या सकाळी समोर आली असून, चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शेख नवीद यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलिसात 28 ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल.