जालना: ’शांती कुंज’ विषबाधा प्रकरणाची बाल हक्क आयोगाकडून गंभीर दखल;सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश!
Jalna, Jalna | Jul 5, 2026 जालना शहरातील शासकीय ’शांती कुंज’ महिला राजगृहात चार अल्पवयीन मुलींना झालेल्या कथित अन्नविषबाधा प्रकरणाची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसांच्या आत सविस्तर कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. रविवार दि. 5 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आयोगाने या प्रकरणात स्वतःहून याचिका दाखल करत प्रशासनाला कठोर शब्दांत जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.