औंढा नागनाथ: वंदे मातरम गीताचे 150 वर्षे भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन औंढा नागनाथ शहरातील सेवालाल मंदिर परिसरात उत्साहात साजरा
वंदे मातरम गीताचा 150 वर्धापन दिनानिमित्त दिनांक सात नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता औंढा नागनाथ शहरातील संत सेवालाल महाराज मंदिर परिसरात सामूहिक वंदे मातरम गीत गात भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार हरीश गाडे, महंत पद्मनाभ गिरी महाराज, गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे,प्राचार्य जीजी पाटणकर, रवी कवडे, बाल प्रकल्प अधिकारी संगीता इंगळे, एडवोकेट स्वप्निल मुळे, उपस्थित होते.