अहमदपूर: निवडणूक विभाग सज्ज, पोलीस प्रशासनाच्या 'कडक' बंदोबस्तात अहमदपूर नगरपरिषदेसाठी उद्या मतदान!
निवडणूक विभाग सज्ज, पोलीस प्रशासनाच्या 'कडक' बंदोबस्तात अहमदपूर नगरपरिषदेसाठी उद्या मतदान! अहमदपूर नगरपरिषदेच्या २५ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मंगळवार, ०२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होणारे हे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक विभाग आणि पोलीस प्रशासन दोघांनीही जोरदार तयारी केली आहे. मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. प्रशासकीय तयारी आणि मतदान माहिती निवडणूक विभागाने दिलेल