जालना: भजनाच्या सुरांतच थांबला प्रबोधनाचा स्वर!
बंजारा समाजाचे थोर प्रबोधनकार रामधन महाराज राठोड यांचे उष्माघाताने निधन; समाजा
Jalna, Jalna | May 15, 2026 भजनाच्या सुरांतच थांबला प्रबोधनाचा स्वर! बंजारा समाजाचे थोर प्रबोधनकार रामधन महाराज राठोड यांचे उष्माघाताने निधन; समाजावर शोककळा.. आज दिनांक 15 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : बंजारा समाजाचे प्रसिद्ध प्रबोधनकार तथा भजनकार रामधन महाराज राठोड यांचे भजन सुरू असतानाच उष्माघाताने दुर्दैवी निधन झाल्याची हृदयद्रावक घटना जालना जिल्ह्यातील सुरुमगाव तांडा येथे घडली. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण बंजारा समाजावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे