तेल्हारा: हिवरखेड येथे महाराजा श्री अग्रसेनजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Telhara, Akola | Sep 28, 2025 हिवरखेड येथे महाराजा श्री अग्रसेनजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संकट मोचन मंदिराजवळील श्री अग्रसेन भवनच्या प्रस्तावित जागेवर झालेल्या कार्यक्रमात महिला मंडळ व लहान मुलांचे सांस्कृतिक सादरीकरण, भजन-कीर्तन, पूजन, महाआरती व तीर्थप्रसाद झाले. अग्रसेनजींच्या जीवनकार्यावर जेष्ठ मार्गदर्शकांनी भाष्य केले. डॉ. मुरलीधर अग्रवाल, संतोष बजाज, गणेश अग्रवाल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. महिला मंडळ व नवयुवती मंचाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.