नागपूर ग्रामीण: नातेवाईक महिलेनेच लांबविले सोन्याचे दागिने; वडोदा पोलिसांकडून गुन्हा उघड
मुलीच्या वाढदिवसासाठी कपाटातील दागिने काढायला गेलेल्या पित्याला चोरी झाल्याचे समजताच खळबळ उडाली. मात्र, वडोदा पोलिसांनी कौशल्याने तपास करत अवघ्या काही दिवसांत चोरीचा छडा लावून २ लाख ४० हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. नामदेव महादेवजी राऊत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली वडौदा पोलिसांनी तपास चक्र फिरवली.