जळगाव: रायपूर फाटा एका तरुणाला चौघांकडून बेदम मारहाण; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील रायपूर फाटा येथे भाड्याचे पैसे देण्याच्या कारणावरून एका तरुणाला चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून त्याच्या कपाळावर लोखंडी कडे मारून दुखापत केल्याची घटना 29 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 वाजता घडली आहे. या संदर्भात शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.