अमरावती: अमरावती पोस्टल डिव्हिजन मध्ये " बचत उत्सव " अभियान; 18 ऑगस्ट ते 30 ऑक्टोबर पर्यंत इच्छुकांना योजनांचा लाभ घेण्याची संधी
अमरावती पोस्टल डिव्हिजन मध्ये दिनांक 18 ऑगस्ट ते 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत डाक विभागाकडून ' बचत उत्सव ' अभियान राबविण्यात येत आहे. या विशेष अभियान अंतर्गत नागरिकांना पोस्ट विभागाच्या बचत योजनामध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केल्या जात आहे. यामध्ये प्रामुख्याने सुकन्या समृद्धी खाते अर्थातच एस. एस. ए. आणि पब्लिक प्रोविडेंट फंड म्हणजेच पी.पी.एफ. योजनांचा समावेश आहे. सुकन्या समृद्धी योजना म्हणजेच एस. एस. ए. ही योजना दहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींसाठी आहे.