जालना: प्रभाग क्रमांक 13 मध्ये 100 एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाला वेग; नगरसेवकांच्या पुढाकारातून विकासाला चालना
Jalna, Jalna | Jun 30, 2026 जालना शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये नागरिकांना सुरक्षित व प्रकाशमान वातावरण मिळावे या उद्देशाने सुमारे 100 एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाला वेग आला असून, या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. "सबका साथ, सबका विकास" हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून भवानीनगर, सिद्धिविनायक नगर, तुळसी पार्क, योगेश्वरी कॉलनी, शंकर नगर, निळकंठ नगर, संजय नगर, अहमद कॉलनी, वर्धमान नगर, कचेरी रोड, कोळेश्वर गल्ली, सावरकर गल्ली, रमाबाई नगर, जिल्हा परिषद क्वार्टर, आपसा कॉलनी, सिटी