कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा, खर्डी गणेश शिवारात शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर चालवत असताना त्यात सापडून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (ता. ५) दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत बाळनाथ उर्फ साहेबराव पुंजाबा रोहोम (वय ६०) असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते कोपरगाव तालुक्यातील खर्डी गणेश शिवार येथील रहिवासी आहेत