कामठी: दसऱ्या आधीच नागपूरकरांना नवीन गिफ्ट ,कामठी घोरपड लिही गाव रेल्वे उडान पुलाचे लोकार्पण
Kamptee, Nagpur | Sep 29, 2025 कामठी घोरपड लिहीगाव रस्त्यावर बांधण्यात आलेल्या ७०८.६६ मीटर लांबीच्या रेल्वे उडान पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या उडान पुलामुळे नागपूर जबलपूर, कामठी गुंतला कुही आणि नागपूर कोलकत्ता हे महत्त्वाचे मार्ग जोडले जातील. यामुळे नागपूर शहर कामठी शहर आणि कामठी ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.