भंडारा शहरातील खात रोड फ्रेंड्स कॉलनी परिसरातील एका वेल्डिंग शॉपमध्ये अचानक एका स्कूटीने पेट घेतल्याची घटना घडली. ही घटना दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान घडली. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने प्राथमिक उपाययोजना सुरू केल्या. वेल्डिंग शॉपजवळ उपलब्ध असलेल्या रेती चा वापर करून नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले. नागरिकांच्या या तत्काळ व सामूहिक..