शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे खासदार अमर काळे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून सरकारने तात्काळ कर्जमाफीचा निर्णय घेणे अत्यावश्यक असल्याचे खासदार काळे यांनी नमूद केले.