जालना: राजमहल टॉकीज ते वैद्यकीय महाविद्यालय रोडवरील 35 अतिक्रमणे हटवली; नाला झाला मोकळा
Jalna, Jalna | May 24, 2026 जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम राबवून राजमहल टॉकीज जवळील पूल ते वैद्यकीय महाविद्यालय रोड, सुभद्रा नगर परिसरातील तब्बल 35 अतिक्रमणे हटवण्यात आली. रविवार दि. 24 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे परिसरातील नाले आणि मुख्य रस्ते मोकळे करण्यात यश आले आहे. महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार तसेच सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.