मोहाडी: लावेश्वर येथे उधारीच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला चढविणाऱ्या आरोपी विरुद्ध वरठी पोलिसात गुन्हा दाखल
मोहाडी तालुक्यातील लावेश्वर येथे दि. 17 सप्टेंबर रोज बुधवारला सायं.6.30 वा.च्या सुमारास फिर्यादी आतिश किशोर बनसोड हा आपल्या भावाच्या पानठेल्यात बसला असता आरोपी शत्रुगन झंझाड यांनी फिर्यादीच्या भावाला खर्रा मागितला असता फिर्यादीच्या भावाने तुला उधारी खर्रा देत नाही असे बोलला. यावेळी आरोपीने त्याला शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादी आतिश बनसोड याने तू माझ्या भावाला शिवीगाळ कशाला करतो असे हटकले असता आरोपीने आपल्या घरातून कुऱ्हाड आणून फिर्यादीवर हल्ला चढवून जखमी केले.