नाशिक: बाबाज थिएटरच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हिंदी गीतांचा जल्लोष"
Nashik, Nashik | Sep 16, 2025 बाबाज थिएटरच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रोटरी क्लबच्या ‘कल्चरक फेस्ट’चे चौथे पुष्प प. सा. नाट्यगृहात फुलले. यावेळी ‘द गोल्डन इरा’ या स्वर्णिम काळातील गाण्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे दिग्दर्शन व सूत्रसंचालन ज्ञानेश वर्मा यांनी केले. प्रमुख पाहुणे डॉ. संजय पाटील, बांधकाम व्यावसायिक आल्हाद वाघ, तसेच रोटरी क्लबचे रोटे. अवतारसिंग पैनफेर, रोटे. डिंपल सचदे, रोटे. नविता पारख, रोटे. कैलास सह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.