अमरावती: वलगाव येथील अनेक युवा कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्याहस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश
वलगाव येथील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्याहस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. याप्रसंगी त्यांचे भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी वलगाव येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते