कुंडलवाडी बसस्थानक येथे दि १८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास यातील आरोपी राम राचोटी व ३० वर्ष हा विनापरवाना बेकायदेशीरित्या धारदार शस्त्र ताब्यात बाळगून संशयीतरित्या वावरात असताना पोलिसांना मिळून आला. याप्रकरणी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल मिर्झा फैयाज रियाज बेग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख हे आज करीत आहेत.