जळगाव जामोद: उन्हाळी पिकाच्या नुकसानीची नुकसान भरपाई द्या , वनुर शिवारातील शेतकऱ्यांची तहसीलदार कडे निवेदनाद्वारे मागणी
उन्हाळी पिक ज्वारी मक्का इत्यादी पिकाच्या नुकसानीची नुकसान भरपाई द्या अशी मागणी वनूर शिवारातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे. मे महिन्यात तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने उन्हाळी पीक मका ज्वारी इत्यादी पिकाची नुकसान झाले त्याचा सर्वे सुद्धा करण्यात आलेला आहे परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.