ठाणे: ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शरद पवार गटाचे आंदोलन
Thane, Thane | Oct 17, 2025 अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी देशोधडीला लागला असून मात्र सरकार फसव्या घोषणा करीत आहे असा आरोप शरद पवार गटाने केला आहे. त्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाने आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काळी दिवाळी साजरी करा म्हणत आंदोलन केलं. या वेळी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.